आगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे एनएमएमएस मध्ये 14 विद्यार्थी पात्र
PGR26B03483
आगळगाव ः येथील लोकसेवा विद्यालयाचे एनएमएमएस मधील पात्र विद्यार्थी व शिक्षक.
लोकसेवा विद्यालयाचे १४ विद्यार्थी शिष्यवृती परीक्षेत यशस्वी
पांगरी : आगळगाव (ता. बार्शी) येथील लोकसेवा विद्यालचाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत प्रशालेतील १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांनी शिष्यवृत्ती मिळवण्याचा मान पटकावला आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षे दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. यामध्ये स्वराली डमरे, तेजस्विनी जाधव, राधिका गायकवाड, सिद्धी विधाते, केदार पाटील, अर्जुन गिराम, यश उकिरडे, आर्यन जाधव, समर्थ नलावडे, ओम जाधव, तन्मय कदम, श्रेयस विधाते, श्रेयश मिरगणे, श्रेयश गरड यांनी यश मिळविले आहे. या यशामुळे परिसरात विद्यालयाचे कौतुक होत असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

