लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीनिमित्त वाहतूक मार्गात बदल
Published on

(लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती) लोगो करावा
-----------
मिरवणुकीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

पोलिस आयुक्तांचे आदेश; रविवारी सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीच्या सांगता मिरवणुका ९ ऑगस्ट रोजी निघणार आहेत. यानिमित्त रविवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मिरवणुकीच्या मार्गावर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी वाहतूक मार्गात बदल केल्याचे काढले आहेत.
रविवारी (ता. ९) सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश मिरवणूक मार्गांवर ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी लागू असणार आहे. या कालावधीत मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या रहदारीस आणि पार्किंगला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विजापूरवरून ये-जा करणाऱ्या जड वाहनांनी नवीन बायपास रोडचा वापर करायचा आहे. अक्कलकोटकडून येणाऱ्या वाहनांसाठी नवीन अक्कलकोट नाका- शांती चौक- जुना बोरामणी नाका- मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच मंगळवेढ्याकडून येणाऱ्या वाहनांनी नवीन बायपासचा वापर करावा लागणार आहे. पण, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि पोलिसांच्या वाहनांसाठी हा आदेश लागू असणार नाही.
--------------------------
बंद असणारा मिरवणूक मार्ग
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक- रामलाल चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- चार पुतळा- खान मस्जिद- सरस्वती चौक- नवीवेस चौक- मेकॅनिक चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- अँबेसेडर हॉटेल.
------------------------
वाहनधारकांसाठी ‘हे’ पर्यायी मार्ग
- जुळे सोलापूरकडून मंगळवेढ्याकडे जाणारी वाहने : पत्रकार भवन- महावीर चौक- गुरूनानक चौक- संत तुकाराम महाराज चौक- अशोक चौक- शांती चौक- जुना बोरामणी नाका-मार्केट यार्ड- शेळगी क्रॉस रोड- जुना तुळजापूर नाका- कारंबा नाका- जुना पुना नाका- नवीन हत्तुर बायपासमार्गे पुढे जाता येईल.
- मंगळवेढ्याकडून सोलापुरात येणारी वाहने : नवीन बायपास रोडने पुणे महामार्गावरील बाळे येथून जुना पुना नाका- कारंबा नाका- जुना तुळजापूर नाका- शेळगी क्रॉस रोड- मार्केट यार्ड-हैदराबाद रोडवरून पुढे इच्छितस्थळी.
- रेल्वे स्टेशनकडून बस स्टॅंण्डकडे येताना : रेल्वे स्टेशन- सात रस्ता- रंगभवन चौक- विजापूर वेस- बाकळे प्रेस कॉर्नर- भावसार पथ- समाचार चौक- कोंतम चौक- कुंभार वेस- बलिदान चौकमार्ग पुढे जाता येईल.
- जुना पुना नाक्याकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने : जुना पुना नाका- जुना कारंबा नाका- जुना तुळजापूर नाका- बोरामणी नाका- शांती चौक- सात रस्ता ते रेल्वे स्टेशन किंवा जुना पुना नाका- वसंत विहार ५४ मीटर रोड- सीएनएस हॉस्पिटल- मरिआई चौक- नागोबा मंदिर- रामवाडी दवाखाना- मोदी स्मशानभूमी- मोदी चौकीसमोरून रेल्वे स्टेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shakuntalabai Saptal, the second daughter of Lokshahir Annabhau Sathe and a witness to his literary, cultural and political journey, passed away at the age of 92 in Nalasopara.
Anna Bhau Sathe Jayanti significance
anna bhau sathe jayanti pune traffic diversion swargate sarasbaug jedhe chowk alternative routes pr patil pune traffic police
solapur city police
Marathi News Esakal
www.esakal.com