
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा, म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ स्थापन करून त्याद्वारे विविध ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे, तसेच जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर व्हावा, यासाठी देशपातळीवर पाठपुरावा करण्याचा ठराव समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये झाला.