लोणावळ्यात आधार कार्ड केंद्र सुरू करण्याची मागणी

लोणावळ्यात आधार कार्ड केंद्र 
सुरू करण्याची मागणी
Published on

लोणावळा, ता. १२ : लोणावळा शहरात आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक जाकीर खलिफा यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन शहरात पुन्हा आधार कार्ड केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
लोणावळा शहरातील आधार कार्ड केंद्र गेल्या वर्षभरापासून बंद असल्यामुळे नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शहराबाहेर जावे लागत आहे. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच नवजात बालकांच्या पालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक शासकीय योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने नागरिकांची धावपळ वाढली आहे. नागरिकांना खोपोली, मळवली किंवा इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्चही नागरिकांना सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता आवश्यक कार्यवाही करून लोणावळा नगरपरिषद हद्दीत आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात यावे, अशी विनंती नगरसेवक खलिफा यांनी केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com