बंद बंगला फोडत लोणावळ्यात घरफोडी

बंद बंगला फोडत 
लोणावळ्यात घरफोडी
Published on

लोणावळा, ता. २ : शहरातील बाराबंगला परिसरातील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल १४ लाख १५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज, हिरेजडित दागिने, रोकड असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
नीलेश वर्तक (वय ५६, रा. सह्याद्री फार्म, लोणावळा कॉलेजमागे, वलवण, लोणावळा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार (ता.३०) ते सोमवार (ता.३१) यादरम्यान ही घटना घडली. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या मागील कंपाउंडवरून उडी मारून आवारात प्रवेश केला. त्यानंतर पत्र्याच्या शेडवरून पुढील गॅलरीत येऊन गॅलरीचा लाकडी दरवाजा तोडला आणि बंगल्यात प्रवेश केला. घरातील कपाटातून ऐवज लंपास केला. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये आठ लाख रुपये किमतीच्या आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, ८० हजार रुपयांचे पेंडंट व कानातील एअररिंग, एक लाख ५० हजार रुपयांची हिरेजडित बांगडी, एक लाख रुपयांचे हिरेजडित एअररिंग, ५० हजार रुपयांची सोन्याची चैन, ८० हजार रुपयांचे हिरेजडित मंगळसूत्र, पाच हजार रुपयांचे घड्याळ तसेच एक लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण १४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com