आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

Published on

लोणावळा, ता.३ : लोणावळा येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘मैत्र जिवाचे हे पाचवे स्नेहसंमेलन पार पडले. ४० वर्षांपूर्वीच्या म्हणजेच १९८६ ते १९९२ या बॅचच्या विद्यार्थ्यांचा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नरेंद्र देशमुख होते. धावपळीच्या जीवनात प्रेम आणि जिव्हाळा ही प्रत्येकाची गरज बनली आहे. अशा भेटगाठीतूनच आपुलकीचे बंध अधिक घट्ट होत जातात, असे देशमुख यांनी सांगितले. महाविद्यालयाचे निवृत्त क्रीडा शिक्षक दिलीप महाजन यांनी उपस्थित राहून आठवणींना उजाळा दिला. २०१८ पासून माजी विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांना शोधून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये वकील, शिक्षक, व्यापारी तसेच सरकारी व खासगी क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक सदस्य दरवर्षी एकत्र येत मैत्रीचा सोहळा साजरा करतात.
या प्रसंगी नृत्य, गायन, मनोरंजनात्मक खेळ तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. बाळकृष्ण बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com