

पिंपरी, ता. २० : लोणावळ्यातील टायगर आणि लायन्स पॉईंटवरील बहुप्रतीक्षित ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाच्या निविदेचा मसुदा अंतिम झाला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’ आयुक्त अभिजीत चौधरी यांनी दिली. कुरवंडे परिसरातील या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता आणि दर विश्लेषण पूर्ण झाले आहे. १२५ मीटरच्या या काचेच्या पुलामध्ये २३ मीटरचा ‘कँटिलीव्हर’ भाग आकर्षणाचे केंद्र असेल. या प्रकल्पात पर्यटकांसाठी दर्शनी गॅलरी, भव्य रेस्टॉरंट, आधुनिक पार्किंग, स्वतंत्र वीज उपकेंद्र आणि सुसज्ज स्वच्छतागृहे अशा सुविधांचा समावेश असेल, असे चौधरी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.