

Lonavala police plan to reopen the old market police chowky.
esakal
लोणावळा : लोणावळा शहर पोलिस स्टेशन नवीन जागेत स्थलांतरित झाल्यानंतर बाजारपेठेतील जुनी पोलिस चौकी रिक्त झाली होती. मात्र, शहरातील वाढत्या चोरीच्या घटना, बाजारपेठेतील नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूककोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर ही जुनी पोलिस चौकी पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय लोणावळा शहर पोलिसांनी घेतला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली.