lonavala pune local stop by youth congress
lonavala pune local stop by youth congresssakal

Pune News : युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोणावळा-पुणे लोकल रोखली

भाजपकडून राजकीय सूडाची कारवाई आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधी यांच्यावर खोट्या केसेस लावून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर हल्ला आहे.
Published on

पुणे - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खडकी रेल्वे स्थानकावर लोणावळा- पुणे लोकल अडवली. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा गैरवापर करून भाजपकडून काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करीत आहे. त्याच्या निषेधार्थ प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रेल्वे स्थानकावर पुणे-लोणावळा लोकल रोखून आंदोलन करण्यात आले.

‘भाजपकडून राजकीय सूडाची कारवाई आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधी यांच्यावर खोट्या केसेस लावून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर हल्ला आहे. देशात भाजपचा हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही,’ असा इशारा राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी दिला.

या आंदोलनात तारीख बागवान, प्रथमेश आबनावे, प्रवीण बिरादार, महेश म्हेत्रे, कौस्तुभ नवले, चैतन्य जायभाये, मतीन शेख, विक्रांत धोत्रे, राहुल शिंदे, अक्षय बहिरट, मुरली बुद्रराम, हर्षद हांडे आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com