Maharashtra Police Bribery Case
esakal
मावळ : भावावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासह गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून यापूर्वी टप्प्याटप्प्याने एक लाख ३० हजार रुपये स्वीकारल्यानंतर आणखी २० हजार रुपयांची लाच घेताना लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई लोणावळ्यातील न्यायालय परिसरात करण्यात (Lonavala Rural Police ACB action) आली.