
लोणावळा : लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेले लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत असून, दुसरीकडे यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथे प्लॅस्टिक व कचरा वाढत असून यामुळे पर्यावरणास हानी पोहचत आहे.