लोणावळा हद्दीमधील एकल महिलांचे सर्वेक्षण

लोणावळा हद्दीमधील
एकल महिलांचे सर्वेक्षण
Published on

लोणावळा, ता. २४ : महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार लोणावळा नगरपरिषद हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ एकल महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत असून, संबंधित महिलांनी आवश्यक माहिती नगरपरिषद प्रशासनाला उपलब्ध करून देण्याचे आवाहन नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष देविदास कडू यांनी केले.
सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १८ वर्षांवरील अविवाहित महिलांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्रभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांनी अचूक व आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे. एखाद्या एकल महिलेला माहिती द्यायची असल्यास किंवा कार्यालयीन वेळेत स्वतःची माहिती नगरपरिषदेकडे नोंदवायची असल्यास, ३० ऑगस्टपूर्वी नगरपरिषदेच्या लेखापरीक्षक प्रतिमा पासलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून संबंधित महिलांची आवश्यक माहिती संकलित करून त्यांच्यासाठी अधिक प्रभावी व समावेशक धोरणे आखण्यास मदत होणार आहे.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com