रस्ता रुंदीकरणासाठी ४१ झाडांवर कुऱ्हाड?

रस्ता रुंदीकरणासाठी ४१ झाडांवर कुऱ्हाड?
Published on

लोणावळा, ता. १४ : प्रस्तावित ‘स्कायवॉक’च्या रस्ता रुंदीकरणासाठी रायवूड येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते ट्रायोज मॉल परिसरातील ४१ झाडांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लोणावळ्यात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर, नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार २२ झाडांचे पुनर्रोपण, तर १९ झाडे तोडण्याचे प्रस्तावित आहे.
या वृक्षतोडीला स्थानिक नागरिक, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. नागरिकांनी नगरपरिषदेकडे हरकती नोंदविल्या आहेत. ‘‘शहरातील रस्ते रुंदीकरण, वाहतूक नियोजन आणि वर्षभर भेडसावणारी वाहतूक कोंडी यांसारखे प्रश्न प्रलंबित असताना, विकासकामांच्या नावाखाली वृक्षतोड करून नागरिकांच्या अडचणी वाढवू नयेत,’’ अशी भूमिका मांडण्यात आली आहे. ‘‘प्रकल्पाचा आराखडा बदलून जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा, तसेच पर्यायी तांत्रिक उपायांचा अभ्यास करावा,’’ अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ४१ झाडांची प्रजाती, वय, खोडाचा घेर आणि तोड अथवा पुनर्रोपणामागील तांत्रिक कारणे स्पष्ट करणारा स्वतंत्र वृक्ष सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी आहे. ‘‘पुनर्रोपित होणारी २२ झाडे कुठे आणि कोणत्या पद्धतीने लावली जाणार, तसेच त्यांच्या देखभालीची जबाबदारी कोणाची असेल, याचा खुलासा करावा. प्रकल्प ‘पीएमआरडीए’मार्फत असल्यास मंजूर सविस्तर प्रकल्प अहवाल, रस्ता रुंदीकरणाचा नकाशा व तांत्रिक मंजुरी नागरिकांसमोर जाहीर करावी. सर्व कागदपत्रे व अहवाल सार्वजनिक होईपर्यंत झाडांची तोड करू नये,’’ अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com