Pune Rain Update : मुसळधार पावसामुळे लोणावळा आणि परिसरात रस्ते जलमय झाले असून, वाहतूक विस्कळीत आणि अनेक सोसायट्यांत पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
लोणावळा : लोणावळ्यात बुधवार (ता.१८) ते गुरुवार (ता.१९) या २४ तासांत सुमारे २२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभरात पावसाचा जोर कायम होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.