
लोणावळा : लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने दोन दिवसांत बाजारपेठ भागात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या तब्बल २२० वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात एक लाख ८१ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. बाजार परिसरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.