
लोणावळा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस ट्रेलरला पाठीमागून धडकली. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला, तर वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता.१०) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा ते खंडाळा घाट या दरम्यान घडली. बसमध्ये एकूण तेहतीस प्रवासी होते.