तुंगार्ली धरणातून नवीन पाइपलाइनच्या कामाचे भूमिपूजन
लोणावळा, ता. ३ : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील तुंगार्ली धरण ते आशा भोसले यांच्या बंगल्यापर्यंत नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, वरसोलीचे सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच मंदाताई पाटेकर, एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, पीएमआरडीए सदस्य दीपाली हुलावळे यांच्या हस्ते पार पडले. याच परिसरातील रस्तादेखील आमदार निधीतून विकसित करण्यात येणार असून, या दोन्ही विकासकामांचे एकत्रित भूमिपूजन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष रवी पोटफोडे, नवनिर्वाचित नगरसेवक मंगेश मावकर, जीवन गायकवाड, सनी दळवी, अनिता अंभोरे, आरती तिकोने, लक्ष्मी पाळेकर, श्वेता पाळेकर, गायत्री रिले, दीपा अगरवाल, नयना पैलकर, वसुंधरा दुर्गे, स्वप्ना कदम, बाळासाहेब भानुसघरे, मारुती देशमुख, माजी सरपंच बबन खरात, सदस्य अरविंद बालगुडे, नारायण कुटे, मीना शीद, सीताबाई ठोंबरे, ग्रामसेवक दीपक शिरसाठ, अभियंता पंढरीनाथ साठे, ज्ञानदेव लगाडे आदी या वेळी उपस्थित होते.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सुमारे ३८ लाख रुपये खर्चून ३०० मिलिमीटर व्यासाची व ७०० मीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. सध्या तुंगार्ली धरण व ठाकर वस्ती रस्त्याच्या मधोमध असलेली जुनी पाइपलाइन वारंवार गळतीमुळे नादुरुस्त होत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.
हा रस्ता वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने परवानगी मिळण्यात अडथळे येत होते. अखेर आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला मुहूर्त मिळाला असून, लोणावळा नगरपरिषदेने नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

