पुणे: लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ग्लास स्कायवॉक’च्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. दरम्यान, या प्रकल्पासाठी ‘पीएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या पर्यटनस्थळामध्ये आणखी एका पर्यटनस्थळाचा समावेश होणार आहे.