Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पावसाची नोंद; कार्ला फाटा-एकवीरा मार्ग, वेहेरगाव रस्ता व सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत
Heavy rainfall submerged the Karla Phata–Ekvira Temple Road and disrupted normal life across Lonavala.

Heavy rainfall submerged the Karla Phata–Ekvira Temple Road and disrupted normal life across Lonavala.

Sakal

Updated on

लोणावळा : लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली असून, रविवारी (ता. ५) सायंकाळी पर्यंतच्या ३६ तासांत तब्बल ४४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. चालू पावसाळ्यात आतापर्यंत एकूण १,२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी याच तारखेपर्यंत २,३९२ मिमी (९४.१७ इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अद्याप कमी असले, तरी जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने पावसाळा वेग पकडत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com