

Pune News
esakal
पाषाण: पाषाण भागातील लोंढे वस्तीतील कचऱ्याच्या ढिगाला शनिवारी (ता. ९) भीषण आग लागली होती. आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने १० मिनिटांत घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा केल्याने मोठी दुर्घटना टळली.