Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा उद्या निकाल; पाच आरोपींवर चालला खटला

Dabholkar Murder Case: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल उद्या (ता. १०) जाहीर करण्यात येणार आहे.
Dabholkar Murder Case
Dabholkar Murder CaseEsakal

पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल उद्या (ता. १०) जाहीर करण्यात येणार आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली असून हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली लागत आहे.

डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर सकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. सुरुवातील पुणे पोलिस, त्यानंतर एसटीस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) या सर्व हत्या प्रकरणांचा तपास केला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते.

Dabholkar Murder Case
Wagholi Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

या कलमांनुसार आरोपी निश्चिती

तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले

आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

Dabholkar Murder Case
Wagholi Accident : वाघोलीत अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार; 12 दिवसात अपघातात 7 जणांचा बळी

कर्नाटक पोलिसांनी उलगडला हत्येचा कट

बंगळूरमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या खुनाप्रकारणी कर्नाटक एटीएसने चिंचवडहून अमोल काळे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊत याचे धागेदोरे मिळाले. त्याच्या घरातून पोलिसांनी शस्त्रांचा आणि स्फोटकांचा साठा जप्त केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे पोलिसांनी शरद कळसकरला अटक केली. त्याने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com