

Two theft incidents in Loni, Ambegaon: Unknown burglars threatened an elderly woman and robbed her gold ornaments, while another gang broke into a locked house and stole jewellery and cash worth around ₹2.5 lakh.
Sakal
पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथे आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील पेट्या लांब शेतात नेऊन पेटीतील सोन्याची दोन पाने तसेच सोन्याचे मणी व रोख २५०० रुपये असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला तर दुसऱ्या एका घटनेत वृद्ध महिलेच्या घरात घुसुन तिला धमकावून तिच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने असा सव्वा तोळा वजनाचे दागिने चोरून नेले आहे.