
पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथे आज रविवारी सकाळी भारतीय सैन्य दलाने केलेल्या पराक्रमा बद्दल भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत तिरंगा झेंडे हातात घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, इनक्लाब झिंदाबाद च्या घोषणा देत माजी सैनिकांसह शेकडो तरूण, महिला, विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत परिसरातील तब्बल ४० आजी माजी सैनिक व पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.