

Minor Driving Accident in Loni Kalbhor: 82-Year-Old Woman Injured
लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील भाजीमंडईसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गयुबाई बाबुराव कांबळे (वय ८२, रा. बौद्धवस्ती, लोणी काळभोर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या पायाच्या नडगीला, गुडघ्याला आणि बरगडीला दुखापत झाली असून, त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर विश्वराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, अपघातावेळी दुचाकी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले आहे.