A 19-year-old youth and his grandparents were injured in an alleged midnight attack at their home in Loni Kalbhor following a birthday cake dispute.
sakal
लोणी काळभोर, : मित्राच्या वाढदिवसाला केक खाली पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील फुलेवस्ती, सिद्राममळा परिसरात घडली. या हल्ल्यात १९ वर्षीय तरुणाच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला, तर त्याच्या ७० वर्षीय आजोबांचा दगडी खलबत्त्याने मारहाण करून हात फ्रॅक्चर करण्यात आला. आजीलाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या तिघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.