

Loni Kalbhor police arrested an externed criminal who was terrorizing citizens by brandishing a machete in public.
esakal
लोणी काळभोर : पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने पुन्हा लोणी काळभोरमध्ये भररस्त्यात हातात लोखंडी कोयता घेऊन हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला २० जून रोजी चित्रपटाप्रमाणे पाठलाग करत जेरबंद केले आहे.