Two Groups Clash in Loni Kalbhor Over Minor Dispute
सुनील जगताप
थेऊर : लोणी काळभोर येथील इनामदार वस्ती परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात शिवीगाळ करून लोखंडी गज व लाकडी दांडक्याने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.