Pune Crime : पुण्यातील हॉटेलमध्ये माजी सरपंचासह चौघांचा राडा; मालकाच्या तोंडावर बरणी फेकली अन्... सीसीटीव्हीत कैद झाली गुंडगिरी, VIDEO VIRAL

Loni Kalbhor Hotel Attack : मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मालकाचा मुलगा मयूर चौधरी यालाही रामचंद्र यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. तक्रार देऊन परतताना डॉमिनोजसमोर चौघांनी मयूर आणि ओम चौधरी यांना पुन्हा अडवून मारहाण केली.
Pune Crime : पुण्यातील हॉटेलमध्ये माजी सरपंचासह चौघांचा राडा; मालकाच्या तोंडावर बरणी फेकली अन्... सीसीटीव्हीत कैद झाली  गुंडगिरी, VIDEO VIRAL
Updated on: 

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील प्रसिद्ध 'जगदंबा' हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारी आणि तोडफोडीत झाले. हॉटेलचे बिल भरल्यानंतर झालेल्या क्षुल्लक वादातून लोणी काळभोरचे माजी सरपंच राहुल काळभोर आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेल मालक, त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात हॉटेल मालक राजेंद्र चौधरी जखमी झाले असून, काचेचे भांडे त्यांच्या चेहऱ्यावर फेकून मारण्यात आले. याप्रकरणी राहुल दत्तात्रय काळभोर यांच्यासह चौघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...