

Nationwide Protest: Chemists and Druggists Observe One-Day Strike Against Online Pharmacy Dominance
Sakal
लोणी काळभोर : ऑनलाईन औषध विक्री तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलती आणि बनावट औषधांच्या वाढत्या विक्रीमुळे किरकोळ औषध व्यवसाय संकटात सापडल्याच्या निषेधार्थ बुधवार (२० मे) रोजी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय मेडिकल बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे दिवसभर मेडिकल दुकाने बंद राहिल्याने औषध बाजारपेठेवर शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.