लोणीकंद, लोणी काळभोर पोलीस ठाण्यांचा पोलीस आयुक्तालयात समावेश

loni kalbhor Lonikand police Station included in Police Commissioner Office of Pune City
loni kalbhor Lonikand police Station included in Police Commissioner Office of Pune City
Updated on

पुणे : वाढते नागरीकरण, वाढती गुन्हेगारीच्या पार्श्‍वभुमीवर शहरालगत असलेल्या लोणीकाळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्यांचा पुणे पोलिस आयुक्तालयात समावेश करण्यात आला आहे. मंगळवारपासून या दोन्ही पोलिस ठाण्यांचे कामकाज पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सुरू झाले. सोलापुर रस्त्यावरील लोणीकाळभोर आणि नगर रस्त्यावरील लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयात करावा, याबाबतचा प्रस्ताव 2017 मध्ये पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर 26 ऑक्‍टोबर 2020 रोजी लोणीकंद पोलिस ठाण्याचा समावेश पुणे पोलिसांच्या परिमंडळ चारमध्ये तसेच लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचा समावेश परिमंडळ पाचमध्ये करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. 16 मार्च रोजी या दोन्ही पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस दलातून या दोन्ही पोलिस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नगर रस्त्यावरील वाघोली तसेच सोलापूर रस्त्यावरील लोणीकाळभोर हि दोन्ही निमशहरी गावे झाली असून ती आता शहराचाच भाग बनली आहेत. या भागामध्ये नागरिकीकरणाचा वेग प्रचंड आहे, त्याचबरोबर तेथील गुन्हेगारीही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच वाहतूक कोंडी सोडविणे, वाढते अपघातांसह विविध प्रकारच्या गंभीर घटनांमध्ये नागरीकांना त्वरीत मदत उपलब्ध करून देणे, आपत्कालिन परिस्थितीत वेळेत मदत उपलब्ध करून देणे, दोन्ही पोलिस ठाणी शहर पोलिस आयुक्तालयात आल्याने शक्‍य होणार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

"लोणीकाळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलीस ठाण्यांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच या भागातील समस्या विचारात घेऊन पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. दोन पोलिस ठाण्यांच्या समावेशामुळे पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांची संख्या आता 32 झाली आहे.''
- डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन)

पोलिस ठाण्यांचा संपर्क क्रमांक
लोणीकंद पोलिस ठाणे - 9527069100
लोणीकाळभोर पोलिस ठाणे - 020- 6913260

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com