

Married Woman Molested and Threatened in Loni Kalbhor; Accused Arrested
लोणी काळभोर : म्हैस कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर पोलिसांकडून कारवाई सुरू असताना झालेल्या वादाचा राग मनात धरून एका विवाहित महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार लोणी काळभोर येथे घडला आहे. या प्रकरणी गोरक्षक ऋषी कामठे (रा. रामटेकडी, हडपसर) याच्याविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.