लोणी काळभोर पोलिसांनी केली 'त्या' सराईत भाईला अटक

त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त.
crime
crimeSakal Media

लोणी काळभोर (पुणे) : मोकातंर्गत फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी सोरतापवाडी (ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या हद्दीतून रविवारी (ता. २३) अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

crime
बारामती ते सासवड फिल्मी स्टाईलने पोलिसांकडून ट्रकचा पाठलाग

शुभम कैलास कामठे (वय २६ , रा. मराठी शाळेचे मागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कामठे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोहन इंगळे या व्यक्तीला कोयत्याने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला त्वरित पकडण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलिसांना सूचना दिल्या होत्या.

सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम कामठे हा सोरतापवाडी येथे येणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अमित साळुंखे आणि निखील पवार यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या अनुशंघाने आरोपीला पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलिस निरीक्षक राजु महानोर, दादाराजे पवार, पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, नितीन गायकवाड, रोहीदास पारखे, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, राजेश दराडे, दिगंबर साळुंके, बाजीराव वीर, निखील पवार आणि शैलेश कुदळे यांचे पथक तयार करण्यात आले.

crime
पुणे : अंगावर थुंकल्याच्या रागातून 'त्या' महिलेचा तरुणाने केला खून!

सदर पथकाने आरोपी शुभम कामठे पकडण्यासाठी सोरतापवाडी येथे सापळा रचला होता. आरोपी गोल्डन ड्रिम्स लॉजच्या समोर येताच त्याला पोलिसांची चाहुल लागली. आरोपीने पोलिसांना चकवा देवून तेथून पळ काढला. परंतु, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीने पकडले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, आरोपी कामठे याने लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि मारामारी यासारखे गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com