लोणी काळभोर : अंमली पदार्थाची विक्री करणारा रेकॉर्डवरील आरोपी पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षे कऱीता हद्दपार करण्यात आला आहे..लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अंमली पदार्थाची विक्री करणारा रेकॉर्ड वरील आरोपी शेरखान सुधाखान पठाण (वय ५१, रा. किरण बेकरी जवळ लोणी स्टेशन, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) याला पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ पुणे शहर यांचे कार्यालयाकडून दोन वर्षांकरता पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश झाल्याने त्याला लोणी काळभोर पोलिसांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन सातारा येथे त्यांचे नातेवाईकांकडे ताब्यात देऊन तडीपार आदेशाची बजावणी केली आहे..सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६ राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर, विभाग, अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर , पोलीस हवालदार विलास शिंदे, वैजिनाथ शेलार, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे सर्व नेमणूक, सर्वेलन्स विभाग लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.