250-Kilometer Pursuit and Successful Rescue
सुनील जगताप
उरुळी कांचन :अवघ्या ८ तासांत तब्बल २५० किलोमीटर प्रवास करुन लोणी काळभोर पोलीसांनी १३ वर्षीय मुलीच्या अपहरणाच्या गुन्हयाचा छडा लावला असल्याची प्रशंसनीय कामगिरी केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ९ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारांस अपहरण झालेल्या मुलीची आजी सोसायटीतील सुरक्षा केबिनची साफसफाई करीत असताना तिची नात पिडीत मुलगी ही केबिनचे बाहेर थांबलेली होती.