

Loni Kalbhor Police Return Seized Property to Citizens
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : दरोडा,घरफोडी,चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा शिताफीने तपास लावून लोणी काळभोर पोलिसांनी १६ गुन्ह्यातील तब्बल ८ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.हा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांना काल परत दे दिला.त्यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा दिसून आली.तर अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक करून आभार मानले.