loni kalbhor police station four police suspention vehicle theft
loni kalbhor police station four police suspention vehicle theft esakal

Pune News : धक्कादायक! लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलीस चौकी हे स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन झाल्यानंतर बिनधनी वाहने, चोरीची वाहने, गुन्ह्यातील, अपघातातील, विना नंबरची वाहने ही लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे स्थलांतरीत करायची होती.
Published on

उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी काढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलीस चौकी हे स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन झाल्यानंतर बिनधनी वाहने, चोरीची वाहने, गुन्ह्यातील, अपघातातील, विना नंबरची वाहने ही लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे स्थलांतरीत करायची होती. ही वाहने ठेवण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला वनविभागाकडून जागा देण्यात आली आहे.

ही वाहने स्थलांतरीत करण्याचे काम बाळासाहेब घाडगे उर्फ बाळू (झिरो पोलीस) याने केले. या दरम्यान बाळूने यातील काही वाहने त्यात दुचाकी वाहन बाजारात विकल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले असल्याची कबुली त्याने दिली. त्यात त्याने वरील चार पोलीस कर्मचाऱ्यांची नावे सांगितली आहेत. या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com