esakal | कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय? तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus

- लोणी काळभोर पोलिसांकडून 16 जणांवर गुन्हा दाखल.

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय? तर...

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : कोरोनाच्या उपचारानंतर घरी परतणाऱ्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचे स्वागत, विनामास्क व डिजे तालावर सोशल डिस्टन्सिंग न पाळता मोठ्या उत्साहात करणे ही बाब रुग्णांसह नातेवाईकांना चांगलीच महागात पडली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोणी काळभोर पोलिसांनी उमेश उर्फ टक्या निवृत्ती राखपसरे या कोरोनाचे उपचार घेऊन घऱी परतणाऱ्या रुग्नासह, त्याचे स्वागत करणाऱ्या पंधराहून अधिक नातेवाईकांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती कायदा व कोविड 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 साथीचा रोग प्रतिबंधक 1897 कलमाअंतर्मगत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे यापुढील काळात विनामास्क रुग्णांचे स्वागत करणाऱ्या नातेवाईकांबरोबर रुग्णालाही तुरुगांची वारी करावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उमेश राखपसरे यांना कोरोनाची लागण झाल्याने, राखसपरे यांच्या मागील दहा दिवसांपासून हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. कोरोनाचे उपचार संपल्यानंतर, उमेश राखपसरे बुधवारी (ता. १) सायंकाळी घऱी परतले. घऱी परतल्यावर उमेश राखपसरे यांच्या नातेवाईकांनी उमेश यांचे स्वागत डिजे लाऊन, अगदी नाचुन गाऊन केले होते. या स्वागत करतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या हाती लागला होता. यात स्वागताच्या वेळी नाचगाणी करतांना सोशल डिस्टन्सींग व मास्कचा वापर केला नसल्याचे आढळुन आल्याने, बंडगर यांनी वरील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देतांना पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग नागरीकांना घऱाबाहेर पडण्यापुर्वी मास्कचा वापर करण्याबरोबरच, गर्दीत सोशल डिस्टन्सींग पाळा या दोन प्रमुख सुचना करत आहे. मात्र उमेश राखपसरे हा कोरोनाचे उपचार घेऊन परतल्याचे माहित असतानाही, नागरिकांनी स्वागताच्या वेळी मास्कचा वापर केला नसल्याचे व सोशल डिस्टन्सिंगला पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर असल्याने, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या उमेश राखपसरे याच्यासह त्याच्या पंधराहुन अधिक नातेवाईकांना लवकरच अटक केली जाणार आहे. यापुढील काळात वरील प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिस अधिक सतर्क राहणार असून, नागरिकांनी आपआपली काळजी घ्यावी, असे आवाहन सुरज बंडगर यांनी केले आहे. 

पोलिसांकडून लग्न समारंभ व स्मशानभूमीवर लक्ष ठेवले जाणार

लग्न समारंभातील अतिरिक्त गर्दीबद्दल बंडगर म्हणाले, पुर्व हवेलीमधील मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्न समारंभात 50 हून कितीतरी पट अधिक नातेवाईकांची गर्दी होत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. यामुळे आज (शुक्रवार) पासुन पुर्व हवेलीमधील मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह समांरभावर पोलिस पाटील, खबरे व पोलिसांच्या मार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. तर दुसरीकडे अंत्यसंस्कार व दशक्रिया विधी दरम्यानही नियमापेक्षा अधिक नागरीक जमत असल्याचे लक्षात आल्याने, स्मशानभूमीवरही ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस लक्ष ठेवणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वरील दोन्ही ठिकाणी 50 पेक्षा अधिक गर्दी असल्याचे दिसल्यास, नागरिक याबाबत लोणी काळभोर पोलिसांना माहिती देऊ शकतात, अशी माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. लग्न समारंभ असो अंत्यसंस्कार, वरील दोन्ही ठिकाणी नियमांचे पालण न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

loading image