Loni Kalbhor Accident: परीक्षेहून परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव कारची धडक; एकाची प्रकृती गंभीर, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Speeding car hits two students returning from exam one critical driver absconding : परीक्षा देऊन परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव कारची धडक; तेजस साळुंखे गंभीर जखमी, मित्रालाही फ्रॅक्चर
Police Action: FIR Registered Against Unknown Driver at Loni Kalbhor Station

Police Action: FIR Registered Against Unknown Driver at Loni Kalbhor Station

Sakal
Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : परिक्षेचा पेपर देऊन दुचाकी वरून घरी परतत असलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक हा मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला आहे. सदर अपघात लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवशक्ती टायर्स समोर पुणे–सोलापूर महामार्गावर २७ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये तेजस संतोष साळुंखे (वय-२१) व त्याचा मित्र अभय पांडे (वय-२१) हे जखमी झाले आहे. याप्रकरणी तेजसचे काका संभाजी सुरेश साळुंखे (वय-३७, मांजरी खुर्द, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com