.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Police reached the spot in time, brought the situation under control and registered a case for disturbing public peace.
लोणी काळभोर : येथील लोणी कॉर्नर परिसरातील तोरणा खानावळसमोर शनिवारी (ता. १८) रात्री जुन्या वादाचे पडसाद भररस्त्यात उमटले. दोन गट आमनेसामने येत एकमेकांना शिवीगाळ, आरडाओरडा आणि झोंबाझोंबी केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.