

Hooch Crackdown: Loni Kalbhor Police Bust Hazardous Chemical Toddy Laboratory
esakal
लोणी काळभोर : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृतांची संख्या वाढत असतानाच लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करत मानवी आरोग्यास घातक ठरणारी रासायनिक ताडी तयार करणाऱ्या आई-मुलाला जेरबंद केले आहे. घटनास्थळावरून तयार ताडी, घातक स्फटिक पदार्थ आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे.