

Infrastructure Sabotage: Theft of 400kg Copper from High-Capacity Transformer
लोणी काळभोर : येथील तिर्थक्षेत्र रामदरा रोडवरील हिलबी बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या आवारातील महावितरणच्या ६३० केव्हीए क्षमतेच्या विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सुमारे ४०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरुन नेल्या आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.