

Village Uprising: Loni Gram Sabha Demands Immediate Closure of Stone Crusher
Sakal
पारगाव : लोणी ता.आंबेगाव येथील ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत दगड खाणपट्टा( क्रशर )व दगड वाहतुकीला कडाडून विरोध करण्यात आला. लोणी गावाच्या हद्दीतील दगड खाण( क्रशर ) आणि अवैध दगड वाहतूक बंद झालीच पाहिजे. अन्यथा रस्ता रोको व गाव बंद करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी क्रशर मालक व ग्रामस्थांच्या मध्ये शाब्दिक चकमक हि उडाली.