

लोणी काळभोर, ता. २२ : पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एका सराईत गुन्हेगाराने लोणी काळभोर परिसरात कोयत्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शनिवारी (ता. २०) चित्रपटाप्रमाणे पाठलाग करत त्याला अटक केली.
रोहित महादेव पाटील (वय २२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार दीपक गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री पाषाणकर गॅस एजन्सीजवळ एक तरुण कोयता नाचवत नागरिकांना धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच रोहितने पळ काढला, मात्र पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. तपासात रोहितला २३ ऑगस्ट २०२४ पासून दोन वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याचे समोर आले. परवानगीशिवाय हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार महेश करे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.