तीन दारू भट्ट्या उध्वस्त; लोणीकंद पोलिसांची कारवाई

तीन दारू भट्ट्या उध्वस्त; लोणीकंद पोलिसांची कारवाई

वाघोली : वढू खुर्द गाव, पेरणे व वाडे बोल्हाई या परिसरात असलेल्या दारू(alcohol) भट्ट्या लोणीकंद(Lonikand Police) पोलिसानी उध्वस्त केल्या. यामध्ये सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे साहित्य नष्ट करण्यात आले तर तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या परिसरात भट्ट्या सुरू असल्याचे लोणीकंद(Lonikand) पोलिसांना (Police) कळल्यानंतर त्यांनी छाप टाकला. (Lonikand police take action against illegal alcohol sale Vadu Khurd village Paine and Wade Bolhai)

तीन दारू भट्ट्या उध्वस्त; लोणीकंद पोलिसांची कारवाई
पुण्यात कोरोना नियंत्रणात

जेसीबीच्या साह्याने या भट्ट्या तोडण्यात आल्या. तर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, लोखंडी बॅलर, व लाकडांचा ढीग तेथेच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी कविता घनश्याम पवार ( रा. वढू खुर्द ) , नीलम बजरंग परदेशी ( रा. कदमवस्ती रोड, मौलाई चौक, पेरणे), सुरेश सीताराम उपाध्ये ( रा. कोरेगाव मूळ ता. हवेली, जिल्हा-पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका पवार, पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, जाधव, ऋषीकेश व्यवहारे, सागर कडू यांनी कारवाई केली.

तीन दारू भट्ट्या उध्वस्त; लोणीकंद पोलिसांची कारवाई
पक्षातील 'दादां'ऐवजी विरोधक 'दादा' बरा

वाईन शॉप अर्धे शटर ठेवून सुरू

''वाईन शॉप धारकांना केवळ घर पोहच सेवा देण्यास मुभा आहे. मात्र काही वाईन शॉप आले शटर अर्धे उघडे ठेवून ग्राहकांना विक्री करीत असल्याचा प्रकार दिसून येतो. केसनंद रोडवरील एका वाईन शॉपवर अर्धे शटर ठेवून शुक्रवारी विक्री सुरू होती. '' अशा प्रकारे दारू मिळत असल्याने ग्राहकही गर्दी करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com