

H2: Habitual Illegal Liquor Seller Detained Under MPDA Act
esakal
लोणी काळभोर : पोलिसांच्या वारंवार प्रतिबंधात्मक कारवाईला न जुमानता बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू ठेवणाऱ्या सराईत दारूविक्रेत्याला लोणी काळभोर पोलिसांनी अखेर एमपीडीए कायद्याचा दणका दिला आहे. सुरेश रुपा बिरे (वय ६०, रा. नांदेपाटील वस्ती, आर्या हॉटेलमागे, रामदरा रोड, लोणी काळभोर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या दारूविक्रेत्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले असून, त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.