अरे बापरे! पीएमपीच्या उत्पन्नात किती कोटींची झाली तूट बघा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचलनातील तोटा यंदा पुन्हा वाढला असून, चालू आर्थिक वर्षात पीएमपीच्या उत्पन्नात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची तूट आली आहे. उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ कोटी रुपयांची घट झाली आहे. सतत उत्पन्न घटत असल्याने महापालिकेच्या तिजोरीवर ताण येणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचलनातील तोटा यंदा पुन्हा वाढला असून, चालू आर्थिक वर्षात पीएमपीच्या उत्पन्नात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची तूट आली आहे. उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ कोटी रुपयांची घट झाली आहे. सतत उत्पन्न घटत असल्याने महापालिकेच्या तिजोरीवर ताण येणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील विविध मार्गांवर बसगाड्यांची संख्या वाढवून उत्पन्नाचा आकडा वाढविण्याचा प्रयत्न पीएमपी व्यवस्थापन करीत आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांत रोजचे उत्पन्न वाढत आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षात ३४९ कोटी ३६ लाख रुपयांची घट झाल्याचा अहवाल महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक अमरीश गालिंदे यांच्यापुढे पीएमपीने ठेवला आहे. गेल्या वर्षी हा आकडा ३०६ कोटी २९ लाख रुपये इतका होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look at the deficit of crores in PMP income