Hotel Service Tax : कायदा काय सांगतो? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

हॉटेलमध्ये पुरविण्यात आलेल्या सुविधेवर सेवा शुल्क (सर्विस चार्ज) देणे ऐच्छिक असतानाही शहरातील अनेक हॉटेलांत हा शुल्क बेकायदेशीरपणे आकारला जात आहे.
Service Tax
Service TaxSakal Digital
Summary

हॉटेलमध्ये पुरविण्यात आलेल्या सुविधेवर सेवा शुल्क (सर्विस चार्ज) देणे ऐच्छिक असतानाही शहरातील अनेक हॉटेलांत हा शुल्क बेकायदेशीरपणे आकारला जात आहे.

पुणे - हॉटेलमध्ये पुरविण्यात आलेल्या सुविधेवर सेवा शुल्क (सर्विस चार्ज) देणे ऐच्छिक असतानाही शहरातील अनेक हॉटेलांत हा शुल्क बेकायदेशीरपणे आकारला जात आहे. हा शुल्क देण्यास नकार दिल्यानंतर तुम्हाला हे शुल्क द्यावेच लागेल, असा सज्जड दम वजा विनंती केली जात आहे.

देशातील कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क भरणे बंधनकारक नाही. हा शुल्क द्यायचा की नाही हे २०१७ साली ऐच्छिक करण्यात आले आहे. त्या बाबतचा अध्यादेश केंद्र सरकारने जाहीर केला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केल्या आहेत. त्यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील सेवा आणि दर्जा यावरच सेवा शुल्क भरायचे की नाही हे ग्राहकांना ठरवता येणार आहे. मात्र त्यानंतरही अनेक हॉटेलांत सेवा शुल्क आकारण्यात येत असून त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे.

विशेष बाबत म्हणजे सेवा शुल्क घेणेच बेकायदेशीर आहे. त्यामुळे तो किती असावा याबाबत हॉटेल व्यावसायिक मनमानी करीत आहेत. पाचपासून ते २० टक्क्‍यांपर्यंत सेवा शुल्क घेतले जात आहे.

सेवा शुल्कावरही जीएसटी :

कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर किंवा सेवेचा वापर केल्यानंतर त्यावर जीएसटी भरणे बंधनकारक आहे. पण सेवा शुल्कावर कोणताही जीएसटी लागू होत नाही. मात्र या शुल्कावर देखील जीएसटी लावल्याचे काही हॉटेलांच्या बिलात दिसते. त्यामुळे ग्राहकांची सेवा शुल्क आणि त्यावर जीएसटी आकारून दुहेरी पिळवणूक होत आहे.

कायदा काय सांगतो :

सेवा शुल्क भरण्यास जबरदस्ती केली तर ग्राहक संबंधित हॉटेल विरोधात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अन्वये ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार करू शकतो. ग्राहक आयोग संबंधित व्यावसायिकास दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आयोग त्याला दंड आणि नुकसान भरपार्इची शिक्षा सुनावू शकतो.

अनेकांना ही बाब लक्षातही येत नाही :

हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर आपण मागविलेल्याच वस्तुंचे बिल आले आहे का? हे आपण तपासतो. मात्र त्या बिलात सेवा शुल्क आकारण्यात आले आहे का? हे प्रत्येक वेळी तपासतोच असे नाही. ही बाब आपल्या लक्षात आली नाही तर आपण बंधनकारक नसतानाही ही शुल्क देखील भरतो. त्यामुळे हॉटेल चालकांची अतिरिक्त कमार्इ त्यातून होते.

काही दिवसांपूर्वी आम्ही सेनापती बापट रस्त्यावर एका बड्या हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो होतो. त्यातील बिलात सहा टक्के सेवा शुल्क आकारण्यात आले होते. तर पाण्याची बाटली २० रुपयांना असताना बिलात २५ रुपये लावण्यात आले होते. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रारीचा प्रयत्न केला असता त्यांनी आमचे काहीच ऐकून न घेता पैसे भरावेच लागतील असे सांगितले. वाद नको म्हणून आम्ही पैसे देवून निघून आलो. असाच एक अनुभव आणखी एका हॉटेलात आला होता. ७५ हजार रुपयांच्या बिलावर १० टक्के शुल्क आकारले होते.

- मोना दहिभाते, व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com