esakal | चिकनमुळे कोरोना होत असल्याची माहिती पसरविल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे झाले इतके कोटींचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Danger

चिकनमुळे कोरोना होत असल्याची चुकीची माहिती समाजमाध्यमांतून पसरविल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे पंधरा दिवसांत दीडशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती ‘व्यंकीज’चे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांनी दिली.

चिकनमुळे कोरोना होत असल्याची माहिती पसरविल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे झाले इतके कोटींचे नुकसान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औंध - चिकनमुळे कोरोना होत असल्याची चुकीची माहिती समाजमाध्यमांतून पसरविल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे पंधरा दिवसांत दीडशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती ‘व्यंकीज’चे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांच्यासह ‘एनआयव्ही’चे शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. तांदळे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते. राज्यात रोज तीन ते साडेतीन हजार मेट्रिक टन चिकनची विक्री होते; परंतु अफवांमुळे ती दोन हजार मेट्रिक टनांवर आली आहे. केंद्र सरकारने अधिसूचना काढून कोरोनाचा प्रसार चिकनमधून होत नसल्याचे जाहीर करून ग्राहकांचा संभ्रम दूर केल्याने आता चिकनचा खप पुन्हा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

loading image
go to top