पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान; प्राध्यापकांचा प्रश्‍नसंच काढण्याकडे काणाडोळा

Pune University
Pune University

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व तयारी करून ठेवायची असताना प्रश्‍नसंच काढण्याचे काम मात्र संथ गतीनेच सुरू आहे. परीक्षा विभागाने कारवाई करण्याचे परिपत्रक काढले तरी त्यास गांभीर्याने न घेता प्राध्यापकांकडून प्रश्‍नसंच तयार करण्याकडे काणाडोळा केला जात आहे. विशेष म्हणजे जवळपास सात ते आठ हजार प्राध्यापकांचा यामध्ये समावेश आहे. पुणे विद्यापीठाच्या नव्या निर्णयानुसार ११ एप्रिलपासून पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामध्ये सुमारे ५ हजार ७०० विषयांचे प्रश्‍नसंच काढले जाणार आहेत. २० फेब्रुवारीपासून प्रश्न संच तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. प्राध्यापकांना एका प्रश्नासाठी प्रत्येकी १२ रुपये मानधन मिळते, तर एका प्राध्यापकास १ हजार रुपये रक्कमेपेक्षा जास्त मानधनाचे प्रश्न काढता येत नाहीत. प्राध्यापकांना यासाठी वेळ मिळावा म्हणून महाविद्यालयातील कामातून त्यांना सूट देण्यात आलेली आहे. त्याबाबत परीक्षा विभागाने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. तरीही प्राध्यापक त्यांची जबाबदारी टाळत आहेत.

आत्तापर्यंत सुमारे ६० टक्के विषयांचे प्रश्‍नसंच विद्यापीठाकडे आलेले आहेत. अजून, ४० टक्के प्रश्‍नसंच आलेले नाहीत. जे प्राध्यापक टाळाटाळ करत आहेत, त्यांची माहिती इमेलद्वारे मागविण्यात येत आहे. या कामात सुमारे २८ हजार प्राध्यापकांची नियुक्ती झालेली असून, त्यातील सात ते आठ हजार प्राध्यापक टाळाटाळ करत असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे. हे प्राध्यापक उशीर लावतील किंवा प्रश्‍न काढणार नाहीत अशांवर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com