esakal | पुणे विद्यापीठ चौकात पडलेली बॅग मिळाली परत; 1 लाखांचा होता ऐवज
sakal

बोलून बातमी शोधा

lost bag with 50 thousand cash and smart phone found returned

तळेगाव दाभाडे येथील मानसी अतुल ढमाले औंध रस्त्यावरून पुणे शहराकडे येत असताना दुचाकीला अडकवलेली बॅग होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात बॅग पडल्याची खात्री होती. त्याबॅगेत रोख रक्कम ५० हजार, स्मार्ट फोन व इतर वस्तू असा एक लाख किमतीचा ऐवज होता.

पुणे विद्यापीठ चौकात पडलेली बॅग मिळाली परत; 1 लाखांचा होता ऐवज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा, समाधान काटे

पुणे : औंध रोडवरून पुण्याकडे येत असलेल्या अतुल ढमाले यांच्या गाडीला बॅग अडकवली होती. त्यामध्ये रोख रक्कमेसह मोबाइल इत्यादी होते. प्रवासादरम्यान बॅग पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर बॅगेत असलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कॉल लागला नाही म्हणून पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी गेले. त्यानंतर पुन्हा फोन केला असता एका प्रवाशाने बॅग घेऊन येत असल्याची माहिती दिली.

तळेगाव दाभाडे येथील मानसी अतुल ढमाले औंध रस्त्यावरून पुणे शहराकडे येत असताना दुचाकीला अडकवलेली बॅग होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात बॅग पडल्याची खात्री होती. त्याबॅगेत रोख रक्कम ५० हजार, स्मार्ट फोन व इतर वस्तू असा एक लाख किमतीचा ऐवज होता.  पुढे आल्यानंतर हरवलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ढमाले यांनी जवळच असलेल्या चतुश्रृंगी पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी गेले.

हे वाचा - West Bengal election: अमित शहा म्हणाले, 'मी ममतादीदींसारखा नाही'

NOTA ला सर्वाधिक मतं मिळाल्यास निवडणूक रद्द व्हावी?; सुप्रीम कोर्टाची केंद्र,...

चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे अंमलदार अमोल जगताप यांनी सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे बॅग चौकात पडल्याचे लक्षात आले. जगताप यांनी हरवलेल्या मोबाईल वर फोन लावला असता, सांगवी येथील जितेंद्र गोपसुरवे यांनी फोन उचलला. त्यांनी  बॅग घेऊन येत पोलिस स्टेशनला येत असल्याचे सांगितले. ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकारी बसवराज माळी यांना सांगून दोन्ही व्यक्तींना बोलवून एकमेकांविरुद्ध कोणाची तक्रार नसल्याची खात्री केली. त्यानंतर हरवलेला लाखो रूपयांचा ऐवज असलेली बॅग ढमाले यांना परत केली. बॅग परत आणून दिल्याबद्दल गोपसुरवे व तपास केल्याबद्दल जगताप यांचे बसवराज माळी यांनी कौतुक केले.

loading image
go to top